Om युगे युगे
About the Book: काळराक्षस कलीला खात्री पटते की, मानव संपूर्णपणे त्याच्या तावडीत सापडला आहे. आता त्याला पडद्यामागे न राहता प्रत्यक्षपणे समोर येऊन पृथ्वीवर एकछत्री अंमल प्रस्थापित करायचा आहे. त्याकरिता त्याला हवं आहे युगानुयुगे देवगिरीच्या ताब्यात असलेलं प्रभू रामचंद्रांचं दिव्य विश्वसिंहासन. आपल्या हस्तकांसकट महान भूमी महाराष्ट्राला ताब्यात घेत, भारतभूवर वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न तो करतो. बाराव्या शतकात जन्मलेला यादव राजपुत्र सदाशिव पुन्हा सूर्यराजच्या स्वरूपात जन्म घेतो व कली सैतानाला त्याच्या मनसुब्यांपासून रोखू पाहतो. सूर्यराज, त्याची सहचारिणी कल्याणी व मराठीजन महाराष्ट्राला या संकटापासून वाचवू शकतील काय?भारतीय संस्कृतीतील युग संकल्पना, अवतारवाद, पुनर्जन्म, कर्मसिद्धांत व महाराष्ट्राचा भूत-वर्तमानकाळ यांची सांगड घालून महाराष्ट्राचा भविष्यवेध घेणारी, कलीराक्षस व सूर्यराज यांच्यातील संघर्षाची ही रोमहर्षक कहाणी मराठीजनांसमोर सविनय सादर.
Visa mer