Om प्रारंभिक भारत
प्रारंभिक भारत मध्य आशियाशी संबंध आणि शुंग-सातवाहन काळ, दक्षिण भारतातील प्रारंभिक इतिहास, उत्तर भारत गुप्त साम्राज्य आणि हर्षवर्धन, प्रादेशिक राज्य संक्षिप्त इतिहास या चार पाठांद्वारे विद्यार्थ्याना प्राचीन भारताचा एक समृद्ध कालखंड समजू शकेल असा विश्वास आहे. हा अभ्यासक्रम नेमण्याचे विद्यापीठाचे उद्दिष्ट म्हणजे प्रारंभिक भारताचा इतिहास हा एकूणच भारतीय इतिहासाचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. कारण तो संपूर्ण भारतीय इतिहासाचे योग्य आकलन करण्यासाठी मूलाधार आहे. हा विषय विद्यार्थ्यांना प्राचीन इतिहासाचे आकलन होण्याच्या उद्देशाने तयार केलेला आहे. भारतीय सभ्यता आणि संस्कृती तसेच राजकीय घराणी यांच्या उदय आणि विकासाला कारणीभूत असणाऱ्या घटकांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे.
Visa mer